Tuesday, 18 February 2014
Friday, 25 October 2013
महाराष्ट्राची निर्मीती (CREATION OF MAHARASHTRA)
संयुक्त महाराष्ट्र समिती हि समिती महाराष्ट्रासाठी काम करत होती. या समितीने १९५६ साली महाराष्ट्र राज्य स्थापन करण्यासाठी मागणी केली. हि मागणी मराठी माणसांसाठी मराठी बोली जपण्यासाठी करण्यात आली. तसेच महाराष्ट्र राज्यात मुंबईचाही सामावेश करावा आणि मुंबई शहर हे महाराष्ट्राची राजधानी म्हणून घोशित करावे हि मागणी करण्यात आली.
संयुक्त महाराष्ट्र हि समिती केशव जेढे यांच्या नेतृत्वाखाली ६ फेब्रुवारी १९५६ मध्ये पुण्यात स्थापन करण्यात आली. या समितीतील प्रमुख कार्यकर्ते पत्रमहर्शी दैनिक प्रभातकर वालचंद कोठारी, आचार्य अत्रे, प्रभोधनकर ठाकरे, सेनापती बापट, भाई उद्धवराव पाटील आणि शाहिर अमर शेख. या सर्वांनी महाराष्ट्र राज्य स्थापन करण्यासाठी आंदोलने आणि जमेल तेवढे प्रयत्न केले.
नेहरू आणि सरदार वल्लभाई पटेल यांचा 'भाषेवरुण राज्य स्थापन' करण्याला विरोध होता, त्यांच्या मते असं केल्यानंतर भारताच्या स्वातंत्र्याला धोका होण्याची भीती होती. तरीही पुनर्प्रस्थापित राज्य समितितीने राज्य प्रस्थापित करण्यासाठी जोर दिला. सुरवातीला आंध्रप्रदेश, केरळ, कर्नाटक यांच एक राज्य, महाराष्ट्र आणि गुजरात हे एक राज्य सोबत राजधानी मुंबई आणि विधर्भ आणि हैद्राबाद असे शेतकरी वर्गासाठी एक राज्य करण्याचे ठरविण्यात आले. मराठी माणासांचे प्रदेश असे दोन राज्यांमध्ये विभागले जात असल्यामुळे संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्यात आली. १९५६ मध्ये दुसऱ्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समिती निवडुण आली. काग्रेस सरकारची सर्व सूत्रे त्यांच्या हाती आले. या नंतर महाराष्ट्र राज्य स्थापन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी खुप लढे दिले. १९६० साली संयुक्त महाराष्ट्र समितीचे १०५ कार्यकर्ते मुंबईतील फ्लोरा फाउंटेन येथे पोलिसांच्या गोळीबारमध्ये मारले गेले, त्यांच्या स्मरणार्थ फ्लोरा फाउंटेनला हुतात्मा चौक नाव देण्यात आले. शेवटी १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र समितीला स्वतंत्र महाराष्ट्र राज्य आणि मुंबई राजधानी मराठी लोकांसाठी असे राज्य स्थापित करण्यात यश आले.
"आज संयुक्त महाराष्ट्र समितीच्या कार्यकर्त्यांमुळे आपण महाराष्ट्र राज्य पाहत आहोत. त्यांच्या या कमागीरीला सलाम.
जय महाराष्ट्र,जय भीम, जय भारत."
Tuesday, 17 September 2013
गणेश चतुर्थी (Ganesh chaturthi)

''गणेश चतुर्थी'' गणपतीचा जन्म झालेला दिवस. "गणेशोत्सव" लोकमान्य टिळकांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी प्रस्थापित केलेला उत्सव. स्वातंत्र्यपुर्व काळात इंग्रजांनी लोकांना एकत्र भेटण्यास मनाई होती जेणेकरून ते एकत्र येउन त्यांच्याविरुद्ध काही कट रचु शकणार नाही, पण यावर उपाय म्हणून टिळकांनी गणेशोत्सव करण्याचे ठरविले आणि त्या निमित्ताने सर्व एकत्र येतील आणि इंग्रज सरकार काही करूही शकणार नव्हते. लोकमान्य टिळकांनी १८९३ साली ह्या उत्सवाला सुरवात केली. गणपतीची मूर्ती आणुन तीला मकरामध्ये प्रस्तापित करुन तीची पुजा केली गेली आणि अनंत चतुर्थीच्या दिवशी तीचे विसर्जन करण्यात आले. यानंतर पूर्ण राज्यामध्ये हा सण साजरी करण्यात येऊ लागला.
गणेशोत्सव येण्याच्या एक महिना अगोदर गणेशोत्सवाच्या तयारीची सुरवात होते. प्रत्येकजण आपापल्यापरीने गणेशाच्या मकराची सजावट करतात. गणेश मूर्ती बनवणारे कारागीरही अतिशय सुरेख अश्या मुर्त्या बनवतात. वेगवेगळ्या मागणीनुसार हे कारागीर मुर्त्या बनवतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्व लोक मुर्त्या आणतात आणि वाजत गाजत गणरायाचं स्वागत करतातत. गणेशाची दर दिवशी पुजा केली जाते. गणेश चतुर्थी नंतर गणपतीला निरोप देण्याची वेळ येते. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने गणेश मूर्तीचे विसर्जन करतात. काही गणपती दिड दिवसाचे तर काही पाच आणि सात दिवसाचे असतात आणि काही जण अनंत चतुर्थीच्या दिवशी विसर्जन करतात तर काही मोठे गणेश मूर्ती ११ दिवसांनी विसर्जित केले जातात. विसर्जनाच्यावेळी सर्व जण गणपतीला पुढच्या वर्षी लवकर येण्याची मागणी करतात आणि वाजत गाजत गणपतीला निरोप देतात.
आताच्या काळात खुप गणेश मंडळ तयार झाले आहेत. मुंबई मध्ये गणेश गल्ली, लालबागचा राजा, तेजुकाया मंडळ, अशे बहुतेक मंडळ गणपती सण साजरा करतात आणि मंडळात येणारा निधी पुढच्या वर्षाच्या सणासाठी आणि काही आश्रमाध्ये दान केले जातात. ह्या गणपतींना भेट देण्यासाठी मोठ मोठे दिग्गज व्यक्ती येथे येतात. मोठ्या श्रद्ध्येने आणि भावनेने लोकं ह्या गणपतीच्या दर्शानासाठी दिवसभर रांगेत उभे राहतात आणि गणेशाचे दर्शन घेतात. ह्या गणपतींच्या विसर्जनाच्या वेळीही खुप लोकं येतात आणि आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात.

Thursday, 11 July 2013
"" मायबोली मराठी ""
"मराठी हि इंडो आर्यन भाषा आहे. मराठीचा उगम संस्कृत भाषेतून झालेला आहे. मराठी भाषा हि महाराष्ट्राची मातृभाषा आहे आणि हि भारतातील २३ मातृभाषांपैकी एक भाषा आहे. जगातील अधिकतम बोलण्यात येणाऱ्या भाषांपैकी मराठी भाषा हि १९ वी भाषा आहे. मराठी भाषा भारतात जास्त बोलली जाणारी ४ थी भाषा आहे. काहीशी मराठी भाषा गुजरात, मध्यप्रदेश, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि दिव दमण बेट या भागतही बोलली जाते. मराठी भाषेचे अजुन उपभाषाही आहेत ,जसे कि खांदेशी ,अहिरनी ,वर्हाडी ,सामवेदी आणि वादवली. अहिरनी हि भाषा धुळे ,नाशिक ,जळगाव आणि नंदुरबार या ठिकाणी बोलली जाते.खांदेशी हि भाषा खांदेश या ठिकाणी बोलली जाते.वर्हाडी हि भाषा विदर्भ या भागात बोलली जाते.कोंकणी भाषा हि एक वेगळी स्वतंत्र भाषा आहे, कोंकणी भाषेतही उपभाषा आहेत जसे की मालवणी ,वरली ,डांगी आणि आगरी "
Monday, 17 June 2013
महाराष्ट्रातली शेती
"भारत हा शेती प्रधान देश आहे हे सर्वांना माहित असेलच. पावसाळा आला कि सर्वजन शेतीच्या कामाला सुरवात करतात. महाराष्ट्रात विधर्भ भागात जवळ जवळ सर्वच लोक शेतीवर अवलंबून आहेत. आपणास कंटाळवाणी वाटणारा पाउस तर त्यांना देवासारखाच आहे. शेतीची कामे करताना जी मेहनत ते लोक घेतात ती क्वचितच कोणाला जमेल. जर कोणाला ती मेहनत अनुभवायची असेल तर त्यांनी आवर्जुन पावसात गावी जावे आणि शेती कामाचा आनंद घ्यावा. काहींना शेती काम करण्याची आवड असते, ते लोक खास पावसात सुट्टी काढून गावी जातात आणि शेती कामाची मज्जा अनुभवतात. महाराष्ट्रात सहसा शेतीची आधुनिक यंत्रे कमी वापरली जातात. विविद्ध प्रकारची शेती आणि त्यातील कामे आणि अनुभव आपण पुढे पाहुया."
""""महाराष्ट्रातील शेतीची क्षेत्रफळे""""
""""महाराष्ट्रातील पीके""""
ज्वारीची शेती
ज्वारी हे महाराष्ट्रात सर्वात महत्वाच पीक आहे. घाटावरील लोकांच्या जेवानामध्ये ज्वारीची भाकरी हा महत्वाचा पदार्थ आहे. देशामध्ये सर्वात अधिक ज्वारीचे पीक महाराष्ट्रात घेतले जाते. भारत देशात जेवढया क्षेत्रफळामध्ये ज्वारीची शेती केली जाते त्याच्या अर्धी जागा महाराष्ट्रात ज्वारीची शेती करण्यासाठी वापरली जाते. हे पीक जळगाव, बुलढाना, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि औंगाबाद या ठिकाणी जास्त करून घेतली जातात.
तांदळाची शेती

गव्हाची शेती
गव्हाची गरज महाराष्ट्रात असतेच. महाराष्ट्रातील आहारात चपाती हा एक पदार्थ असतोच. उत्तर महाराष्ट्रात जास्त करून गव्हाची लागवड केली जाते. तिकडे गव्हासाठी लागणारे हवामान अनुकूल आहे. एकून देशातील उत्पदानाच्या १.५१ % महाराष्ट्रात गव्हाचे उत्पादन केले जाते. नागपुर, अकोला, अमरावती, औरंगाबाद आणि अहमदनगर या ठिकाणी जास्त करून गव्हाची शेती कली जाते.
कापसाची शेती

Monday, 10 June 2013
आपलं कोंकण
"महाराष्ट्रातील एक मनरम्य आणि मन ताज तवाण करणार पर्यटन ठिकाण म्हणजे कोंकण. महाराष्ट्रातील पूर्ण पच्छिम भाग म्हणजे कोंकण होय. सह्याद्रीच्या पच्छिम भागात कोंकण आहे. महाराष्ट्राची पूर्ण समुद्र किनारपट्टी कोंकण भागात येते. कोंकाणाला अरबी समुद्र लागुनच आहे आणि कोंकणात जास्त करुन नारळाची झाडे पहायला मिळतात. कोंकणातील घरे आणि गोठे उतारू छपराची असतात. कोंकणात जास्त करून भाताची शेती केली जाते. कोंकणातील निरनिराळी परंपरा, उस्तव, प्रदेश आणि राहणीमान पाहण्यासारखे आहे. कोंकणातील मौर्या नदी दक्षिण भागात येते. कोंकणातील बहुतेक प्रदेश हि पर्यटन स्थळे आहेत. पावसातही कोंकणातील द्रुश्ये बघण्यासारखी असतात आणि त्यातील निसर्ग सौंदर्य अनुभवायला मिळते. कोंकणातील काही वैशिष्ट्ये आपण पुढे पाहुया."
"""""""""""""""""""कोंकणातील काही प्रसिद्ध ठिकाणे"""""""""""""""""""
गणपती पुळे मंदिर

गणपती पुळे हे कोंकणातील खुप प्रसिद्ध असे श्रद्धा स्थान आहे. गणपती पुळे पाहण्यासाठी खुप लोक येतात. गणपती पुळे हे रत्नागिरी या ठिकाणी आहे. गणपती पुळेच्या बाजुलाच समुद्र किनारा आहे. खुपश्या चित्रपटांचे चित्रीकरण या मंदिरात झालेले आहे.
कुणकेश्वर मंदिर

मालवण किल्ला

आंबोली घाट
आंबोली घाट हे सिंधुदुर्गातिल रत्नागीरीतील आंबोली या गावात आहे. पावसात आंबोली घाटात धबधबे पहाण्याची मजा काही वेगळीच असते. पावसात खुप जन येथे पर्यटनासाठी येतात. घाटावरुन दिसणारे दृश्ये खुपच मनमोहक असतात.
"""""""""""""""""""""""कोंकणातील फळे """"""""""""""""""""""""""
आंबा

फणस

नारळ
नारळ प्रत्येक समुद्र किनारी भेटणारं फळ. कोकणात नारळाला महत्व आहे. कोंकणी माणसाच्या आहारामध्ये नारळ असतेच आणि नारळाची चटणी तर खुपच स्वादिष्ट असते. कोकणातील नारळाच दूध हे सर्वांना माहितच असेल. नारळाच तेलही काढल जात. कोकणात आपल्याला नारळाच्या माड्या आणि बागा पहायला मिळतात आणि त्याची सौंदर्य तर टिपण्याजोगे असतात. समुद्र किनाऱ्यावरील माडांच्या रांगा तर सुंदरच असतात.
काजु (बोंड)
कोंकणात काजूची लागवड खुप मोठया प्रमाणात केली जाते. कोंकणात काजु सिंधुदुर्गात मोठया प्रमाणात आढळतो. कोंकणात काजु पासून खुप काही बनवले जाते. कोंकणातील काजूची दारू खुप प्रसिद्ध आहे आणि तीला विदेशातही मोठया प्रमाणावर मागणी आहे. हि दारू काजुच्या बोंडापासून तयार केलि जाते. कोंकणातील काजुची भाजीही केली जाते आणि कोंकणी माणसाची आवड आहे.
रतांबे
कोंकणात रतांबे हि एक वैशिष्ट्याची बाब आहे. रतांबे बोलले कि तोंडाला पानी सुटते. दात कितीही चिकट होत असले तरी आपण ते खाण सोडत नाही. या पासून कोकम तयार केले जाते. कोकणी लोक यावरच पुरेसा पैसा कमवतात. रतांबेपासून कोकम सरबत हि बनवले जाते. कोकम सरबत बनवण्यासाठी कोंकणात काही शाखा आहेत. कणकवलीत गोपुरी भागात कोकम सरबत बनवण्यासाठी विविद्ध प्रयोग केले जातात. हे हि विदेशात मोठया प्रमाणावर विकले जाते.
करवंद

Friday, 7 June 2013
"""महाराष्ट्रातील लेण्या"""
"महाराष्ट्र राज्य खासकरुन लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. भारतामध्ये सर्वात अधिक लेण्या महाराष्ट्र राज्यात आहेत. हे लेण्या खुप पुरातन काळातल्या आहेत. त्यातल्या खुपशा लेण्या विहारास आणि चैत्यास होत्या. यातील खुपशा लेण्या बुद्धिस्ट ,हिंदू आणि जैन अनुयायांनी कोरलेल्या आहेत. प्रत्येक लेण्यांमध्ये काही ना काही वैशिष्ट्ये आहेत. बहुतेक लेण्या डोंगराच्या मध्यभागी कोरलेल्या आहेत आणि काही अंधारात कोरलेल्या आहेत. प्रत्येक लेण्यातील कोरीव काम अतिशय सुरेख व सुंदर आहे. काही मुर्त्यांची रचना आचर्यचकित करणारी आहेत ,उदाहरण म्हणजे जर तुम्ही हाताच्या विटेने मूर्ति डावीकडून उजवीकडे मोजली तर एक माप मिळेल आणि उजवीकडून डाविकडे मोजली तर दुसर माप मिळेल. अशाकाही निरनिराळ्या गोष्टी पहायला मिळतात."
महाराष्ट्रातील काही लेण्या
अजिंठा लेणी महाराष्ट्रातील औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये जळगाव मधील अजिंठा गावामध्ये आहे. या लेणीत निरनिराळ्या प्रकारची चित्रे काढलेली आहेत. या लेणीच बांधकाम दोन काळात झालेल आहे, पहिल काम इ.स.पु. दुसऱ्या शतकामध्ये करण्यात आले होते आणि उरलेल काम इ.स.४००-६५० मध्ये करण्यात आले होते. यात २६ पेक्षा अधिक लेण्या कोरलेल्या आहेत.
............................................................."कार्ला लेणी"..........................................................
.........................................................."एलीफंटा लेणी" .................................................

......................................................"कान्हेरी गुफा".....................................................

अर्धवट राहिलेले चित्रकाम

दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या 

Subscribe to:
Posts (Atom)