"महाराष्ट्रातील एक मनरम्य आणि मन ताज तवाण करणार पर्यटन ठिकाण म्हणजे कोंकण. महाराष्ट्रातील पूर्ण पच्छिम भाग म्हणजे कोंकण होय. सह्याद्रीच्या पच्छिम भागात कोंकण आहे. महाराष्ट्राची पूर्ण समुद्र किनारपट्टी कोंकण भागात येते. कोंकाणाला अरबी समुद्र लागुनच आहे आणि कोंकणात जास्त करुन नारळाची झाडे पहायला मिळतात. कोंकणातील घरे आणि गोठे उतारू छपराची असतात. कोंकणात जास्त करून भाताची शेती केली जाते. कोंकणातील निरनिराळी परंपरा, उस्तव, प्रदेश आणि राहणीमान पाहण्यासारखे आहे. कोंकणातील मौर्या नदी दक्षिण भागात येते. कोंकणातील बहुतेक प्रदेश हि पर्यटन स्थळे आहेत. पावसातही कोंकणातील द्रुश्ये बघण्यासारखी असतात आणि त्यातील निसर्ग सौंदर्य अनुभवायला मिळते. कोंकणातील काही वैशिष्ट्ये आपण पुढे पाहुया."
"""""""""""""""""""कोंकणातील काही प्रसिद्ध ठिकाणे"""""""""""""""""""
गणपती पुळे मंदिर

गणपती पुळे हे कोंकणातील खुप प्रसिद्ध असे श्रद्धा स्थान आहे. गणपती पुळे पाहण्यासाठी खुप लोक येतात. गणपती पुळे हे रत्नागिरी या ठिकाणी आहे. गणपती पुळेच्या बाजुलाच समुद्र किनारा आहे. खुपश्या चित्रपटांचे चित्रीकरण या मंदिरात झालेले आहे.
कुणकेश्वर मंदिर
कुणकेश्वर मंदिर हे सिंधुदुर्गातील कुणकेश्वर या गावामध्ये आहे. कुणकेश्वर हे नाव कुणकोबा या देवामुळे पडले आहे. महाशिवरात्रीला खुप जत्रा या मंदिरात होते. हे एक पर्यटनाचे ठिकाण आहे आणि पर्यटनामुळे येथील लोकांच्या रोजगाराचा प्रश्न उरत नाही.मालवण किल्ला
मालवण किल्ला हा सिंधुदुर्गातिल मालवण या ठिकाणी आहे. हा शिवाजी महाराजांनी समुद्रावरिल शत्रुवर नजर ठेवण्यासाठी बांधला होता. हा किल्ला समुद्राच्या मध्यभागी आहे आणि किल्ल्यावर जाण्यासाठी एक गुप्त भुयारी मार्ग आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी पर्यटकांना होडी आणि बोटी आहेत. त्यावरच काहींचा रोजगार आहे. या किल्ल्याचा भटकंती या कार्यक्रमाद्वारे आढावा घेण्यात आला होता आणि समुद्राच्या पण्याखालुन किल्ल्याच्या पायाचा आढावा घेण्यात आला होता.आंबोली घाट
आंबोली घाट हे सिंधुदुर्गातिल रत्नागीरीतील आंबोली या गावात आहे. पावसात आंबोली घाटात धबधबे पहाण्याची मजा काही वेगळीच असते. पावसात खुप जन येथे पर्यटनासाठी येतात. घाटावरुन दिसणारे दृश्ये खुपच मनमोहक असतात.
"""""""""""""""""""""""कोंकणातील फळे """"""""""""""""""""""""""
आंबा
कोंकणाची शान म्हणजे फळांचा राजा आंबा. कोंकण आंब्यासाठी खुप प्रसिद्ध आहे आणि विशेष म्हणजे कोंकणातील आंबा विदेशात विकला जातो. आंब्यातील सर्वात प्रसिद्ध जात आणि लोकांना आवडणारी जात म्हणजे "हापूस". कोंकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात हापुसची लागवड मोठया प्रमाणात केली जाते आणि देवगड हे खास करून हापूससाठी प्रसिद्ध आहे. तसेच कोंकणात रायवळ, कोतापुरी आणि रत्नागिरी आंबे हि मोठया प्रमाणात दिसून येतात.फणस
कोंकणात फणस हा खुप प्रसिद्ध आहे. त्यातील गरे खुप रसाळ आणि गोड असतात. याची भाजीही कोंकणामध्ये खुप छान प्रकारे केलि जाते. सिंधुदुर्गात हि भाजी जनता भाजी या नावानेही ओळखली जाते. फणसाचे दोन प्रकार आहेत 'कापा' आणि 'बरका'. उन्हाळ्याची सुट्टी साजरी करून कोंकणातुन आलेल्या लोकांच्या हातात फणस दिसणारच. जर कोणी पाहुणा येउ शकला नाही तर कोंकणी माणसं आवर्जुन त्यांना फणस पाठवतात. फणस बाराही महीने असतो.नारळ
नारळ प्रत्येक समुद्र किनारी भेटणारं फळ. कोकणात नारळाला महत्व आहे. कोंकणी माणसाच्या आहारामध्ये नारळ असतेच आणि नारळाची चटणी तर खुपच स्वादिष्ट असते. कोकणातील नारळाच दूध हे सर्वांना माहितच असेल. नारळाच तेलही काढल जात. कोकणात आपल्याला नारळाच्या माड्या आणि बागा पहायला मिळतात आणि त्याची सौंदर्य तर टिपण्याजोगे असतात. समुद्र किनाऱ्यावरील माडांच्या रांगा तर सुंदरच असतात.
काजु (बोंड)
कोंकणात काजूची लागवड खुप मोठया प्रमाणात केली जाते. कोंकणात काजु सिंधुदुर्गात मोठया प्रमाणात आढळतो. कोंकणात काजु पासून खुप काही बनवले जाते. कोंकणातील काजूची दारू खुप प्रसिद्ध आहे आणि तीला विदेशातही मोठया प्रमाणावर मागणी आहे. हि दारू काजुच्या बोंडापासून तयार केलि जाते. कोंकणातील काजुची भाजीही केली जाते आणि कोंकणी माणसाची आवड आहे.
रतांबे
कोंकणात रतांबे हि एक वैशिष्ट्याची बाब आहे. रतांबे बोलले कि तोंडाला पानी सुटते. दात कितीही चिकट होत असले तरी आपण ते खाण सोडत नाही. या पासून कोकम तयार केले जाते. कोकणी लोक यावरच पुरेसा पैसा कमवतात. रतांबेपासून कोकम सरबत हि बनवले जाते. कोकम सरबत बनवण्यासाठी कोंकणात काही शाखा आहेत. कणकवलीत गोपुरी भागात कोकम सरबत बनवण्यासाठी विविद्ध प्रयोग केले जातात. हे हि विदेशात मोठया प्रमाणावर विकले जाते.
करवंद
करवंद बोलले कि तोंडाला पानी तर सुटतेच आणि ती सडयावरची सफर आठवते. हि सफर कोकणात गेलेल्यान्नाच माहित असणार. फिरता फिरता वाटेत लागलेली करवंदाची झाडे आणि हावऱ्यासारखे करवंद तोडने सर्व काही डोळ्यासमोर येते. करवंदाचे लोणचे तर सर्वांना ठाउकच आहे.






No comments:
Post a Comment