संयुक्त महाराष्ट्र समिती हि समिती महाराष्ट्रासाठी काम करत होती. या समितीने १९५६ साली महाराष्ट्र राज्य स्थापन करण्यासाठी मागणी केली. हि मागणी मराठी माणसांसाठी मराठी बोली जपण्यासाठी करण्यात आली. तसेच महाराष्ट्र राज्यात मुंबईचाही सामावेश करावा आणि मुंबई शहर हे महाराष्ट्राची राजधानी म्हणून घोशित करावे हि मागणी करण्यात आली.
संयुक्त महाराष्ट्र हि समिती केशव जेढे यांच्या नेतृत्वाखाली ६ फेब्रुवारी १९५६ मध्ये पुण्यात स्थापन करण्यात आली. या समितीतील प्रमुख कार्यकर्ते पत्रमहर्शी दैनिक प्रभातकर वालचंद कोठारी, आचार्य अत्रे, प्रभोधनकर ठाकरे, सेनापती बापट, भाई उद्धवराव पाटील आणि शाहिर अमर शेख. या सर्वांनी महाराष्ट्र राज्य स्थापन करण्यासाठी आंदोलने आणि जमेल तेवढे प्रयत्न केले.
नेहरू आणि सरदार वल्लभाई पटेल यांचा 'भाषेवरुण राज्य स्थापन' करण्याला विरोध होता, त्यांच्या मते असं केल्यानंतर भारताच्या स्वातंत्र्याला धोका होण्याची भीती होती. तरीही पुनर्प्रस्थापित राज्य समितितीने राज्य प्रस्थापित करण्यासाठी जोर दिला. सुरवातीला आंध्रप्रदेश, केरळ, कर्नाटक यांच एक राज्य, महाराष्ट्र आणि गुजरात हे एक राज्य सोबत राजधानी मुंबई आणि विधर्भ आणि हैद्राबाद असे शेतकरी वर्गासाठी एक राज्य करण्याचे ठरविण्यात आले. मराठी माणासांचे प्रदेश असे दोन राज्यांमध्ये विभागले जात असल्यामुळे संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्यात आली. १९५६ मध्ये दुसऱ्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समिती निवडुण आली. काग्रेस सरकारची सर्व सूत्रे त्यांच्या हाती आले. या नंतर महाराष्ट्र राज्य स्थापन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी खुप लढे दिले. १९६० साली संयुक्त महाराष्ट्र समितीचे १०५ कार्यकर्ते मुंबईतील फ्लोरा फाउंटेन येथे पोलिसांच्या गोळीबारमध्ये मारले गेले, त्यांच्या स्मरणार्थ फ्लोरा फाउंटेनला हुतात्मा चौक नाव देण्यात आले. शेवटी १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र समितीला स्वतंत्र महाराष्ट्र राज्य आणि मुंबई राजधानी मराठी लोकांसाठी असे राज्य स्थापित करण्यात यश आले.
"आज संयुक्त महाराष्ट्र समितीच्या कार्यकर्त्यांमुळे आपण महाराष्ट्र राज्य पाहत आहोत. त्यांच्या या कमागीरीला सलाम.
जय महाराष्ट्र,जय भीम, जय भारत."
No comments:
Post a Comment