Pages

mashaal

Monday 17 June 2013

महाराष्ट्रातली शेती

       



       "भारत हा शेती प्रधान देश आहे हे सर्वांना माहित असेलच. पावसाळा आला कि सर्वजन शेतीच्या कामाला सुरवात करतात. महाराष्ट्रात विधर्भ  भागात जवळ जवळ सर्वच लोक शेतीवर अवलंबून आहेत. आपणास कंटाळवाणी वाटणारा पाउस तर त्यांना देवासारखाच आहे. शेतीची कामे करताना जी मेहनत ते लोक घेतात ती क्वचितच कोणाला जमेल. जर कोणाला ती मेहनत अनुभवायची असेल तर त्यांनी आवर्जुन पावसात गावी जावे आणि शेती कामाचा आनंद घ्यावा. काहींना शेती काम करण्याची आवड असते, ते लोक खास पावसात सुट्टी काढून गावी जातात आणि शेती कामाची मज्जा अनुभवतात. महाराष्ट्रात सहसा शेतीची आधुनिक यंत्रे कमी वापरली जातात. विविद्ध प्रकारची शेती आणि त्यातील कामे आणि अनुभव आपण पुढे पाहुया."


                                   """"महाराष्ट्रातील शेतीची क्षेत्रफळे""""











                                            
""""महाराष्ट्रातील पीके""""


ज्वारीची शेती 



ज्वारी हे महाराष्ट्रात सर्वात महत्वाच पीक आहे. घाटावरील लोकांच्या जेवानामध्ये ज्वारीची भाकरी हा महत्वाचा पदार्थ आहे. देशामध्ये सर्वात अधिक ज्वारीचे पीक महाराष्ट्रात घेतले जाते. भारत देशात जेवढया क्षेत्रफळामध्ये ज्वारीची शेती केली जाते त्याच्या अर्धी जागा महाराष्ट्रात ज्वारीची शेती करण्यासाठी वापरली जाते. हे पीक जळगाव, बुलढाना, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि औंगाबाद या ठिकाणी जास्त करून घेतली जातात.







तांदळाची शेती 


ज्वारीनंतर तांदुळ हे महाराष्ट्रात महत्वाच पीक आहे. महाराष्ट्रात जास्त करून जेवनामध्ये भात असतो आणि याची मागणीही खुप आहे. पच्छिम महाराष्ट्रात जास्त करून तांदळाची लागवड केली जाते. तांदळासाठी लागणारी काळी माती महाराष्ट्रात जास्त आहे. तांदळासाठी असणारी सुपिक जमीन जास्त आहे. आज याच पिकाच्या व्यवसायात कित्येक जन श्रीमंत झाले आहेत.



गव्हाची शेती 


गव्हाची गरज महाराष्ट्रात असतेच. महाराष्ट्रातील आहारात चपाती हा एक पदार्थ असतोच. उत्तर महाराष्ट्रात जास्त करून गव्हाची लागवड केली जाते. तिकडे गव्हासाठी लागणारे हवामान अनुकूल आहे. एकून देशातील उत्पदानाच्या १.५१ % महाराष्ट्रात गव्हाचे उत्पादन केले जाते. नागपुर, अकोला, अमरावती, औरंगाबाद आणि अहमदनगर या ठिकाणी जास्त करून गव्हाची शेती कली जाते.






कापसाची शेती 


कापुस हे पीक आवश्यक आहे, त्याशिवाय कापड बनणार नाही. तस हल्लीच्या काळात कृत्रिम कापड बनतात, पण कापसापासून बनलेल्या कापडापासून बनवलेले कपडे शरीरासाठी चांगले असतात. इशान्य महाराष्ट्रात कापसाची लागवड जास्त करून केली जाते. देशातील एकून उत्पदनापैकी सर्वात अधिक उत्पादन महाराष्ट्रात होते. दरवर्षी कापसाचे उत्पादन केले जाते आणि त्याचा दर सरकार ठरवते. कापसाचे उत्पादन अकोला, यवतमाळ, नागपुर, अमरावती, वाशिम आणि वर्धा या ठिकाणी जास्त करुण करून केली जाते.



Monday 10 June 2013

आपलं कोंकण

           

 

        "महाराष्ट्रातील एक मनरम्य आणि मन ताज तवाण करणार पर्यटन ठिकाण म्हणजे कोंकण. महाराष्ट्रातील पूर्ण पच्छिम भाग म्हणजे कोंकण होय. सह्याद्रीच्या पच्छिम भागात कोंकण आहे. महाराष्ट्राची पूर्ण समुद्र किनारपट्टी  कोंकण भागात येते. कोंकाणाला अरबी समुद्र लागुनच आहे आणि कोंकणात जास्त करुन नारळाची झाडे पहायला मिळतात. कोंकणातील घरे आणि गोठे उतारू छपराची असतात. कोंकणात जास्त करून भाताची शेती केली जाते. कोंकणातील निरनिराळी परंपरा, उस्तव, प्रदेश आणि राहणीमान पाहण्यासारखे आहे. कोंकणातील मौर्या नदी दक्षिण भागात येते. कोंकणातील बहुतेक प्रदेश हि पर्यटन स्थळे आहेत. पावसातही कोंकणातील द्रुश्ये बघण्यासारखी असतात आणि त्यातील निसर्ग सौंदर्य अनुभवायला मिळते. कोंकणातील काही वैशिष्ट्ये आपण पुढे पाहुया."


"""""""""""""""""""कोंकणातील काही प्रसिद्ध ठिकाणे"""""""""""""""""""


गणपती पुळे मंदिर



       गणपती पुळे हे कोंकणातील खुप प्रसिद्ध असे श्रद्धा स्थान आहे. गणपती पुळे पाहण्यासाठी खुप लोक येतात. गणपती पुळे हे रत्नागिरी या ठिकाणी आहे. गणपती पुळेच्या बाजुलाच समुद्र किनारा आहे. खुपश्या चित्रपटांचे चित्रीकरण या मंदिरात झालेले आहे.




कुणकेश्वर मंदिर


         कुणकेश्वर मंदिर हे सिंधुदुर्गातील कुणकेश्वर या गावामध्ये आहे. कुणकेश्वर हे नाव कुणकोबा या देवामुळे पडले आहे. महाशिवरात्रीला खुप जत्रा या मंदिरात होते. हे एक पर्यटनाचे ठिकाण आहे आणि पर्यटनामुळे येथील लोकांच्या रोजगाराचा प्रश्न उरत नाही.



मालवण किल्ला


         मालवण किल्ला हा सिंधुदुर्गातिल मालवण या ठिकाणी आहे. हा शिवाजी महाराजांनी समुद्रावरिल शत्रुवर नजर ठेवण्यासाठी बांधला होता. हा किल्ला समुद्राच्या मध्यभागी आहे आणि किल्ल्यावर जाण्यासाठी एक गुप्त भुयारी मार्ग आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी पर्यटकांना होडी आणि बोटी आहेत. त्यावरच काहींचा रोजगार आहे. या किल्ल्याचा भटकंती या कार्यक्रमाद्वारे आढावा घेण्यात आला होता आणि समुद्राच्या पण्याखालुन किल्ल्याच्या पायाचा आढावा घेण्यात आला होता.


आंबोली घाट



         आंबोली घाट हे सिंधुदुर्गातिल रत्नागीरीतील आंबोली या गावात आहे. पावसात आंबोली घाटात धबधबे पहाण्याची मजा काही वेगळीच असते. पावसात खुप जन येथे पर्यटनासाठी येतात. घाटावरुन दिसणारे दृश्ये खुपच मनमोहक असतात.








"""""""""""""""""""""""कोंकणातील फळे """"""""""""""""""""""""""


आंबा 


        कोंकणाची शान म्हणजे फळांचा राजा आंबा. कोंकण आंब्यासाठी खुप प्रसिद्ध आहे आणि विशेष म्हणजे कोंकणातील आंबा विदेशात विकला जातो. आंब्यातील सर्वात प्रसिद्ध जात आणि लोकांना आवडणारी जात म्हणजे "हापूस". कोंकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात हापुसची लागवड मोठया प्रमाणात केली जाते आणि देवगड हे खास करून हापूससाठी प्रसिद्ध आहे. तसेच कोंकणात रायवळ, कोतापुरी आणि रत्नागिरी आंबे हि मोठया प्रमाणात दिसून येतात.


फणस 


        कोंकणात फणस हा खुप प्रसिद्ध आहे. त्यातील गरे खुप रसाळ आणि गोड असतात. याची भाजीही कोंकणामध्ये खुप छान प्रकारे केलि जाते. सिंधुदुर्गात हि भाजी जनता भाजी या नावानेही ओळखली जाते. फणसाचे दोन प्रकार आहेत 'कापा' आणि 'बरका'. उन्हाळ्याची सुट्टी साजरी करून कोंकणातुन आलेल्या लोकांच्या हातात फणस दिसणारच. जर कोणी पाहुणा येउ शकला नाही तर कोंकणी माणसं आवर्जुन त्यांना फणस पाठवतात. फणस बाराही महीने असतो.


नारळ


        नारळ प्रत्येक समुद्र किनारी भेटणारं फळ. कोकणात नारळाला महत्व आहे. कोंकणी माणसाच्या आहारामध्ये नारळ असतेच आणि नारळाची चटणी तर खुपच स्वादिष्ट असते. कोकणातील नारळाच दूध हे सर्वांना माहितच असेल. नारळाच तेलही काढल जात. कोकणात आपल्याला नारळाच्या माड्या आणि बागा पहायला मिळतात आणि त्याची सौंदर्य तर टिपण्याजोगे असतात. समुद्र किनाऱ्यावरील माडांच्या रांगा तर सुंदरच असतात.



काजु (बोंड)


        कोंकणात काजूची लागवड खुप मोठया प्रमाणात केली जाते. कोंकणात काजु सिंधुदुर्गात मोठया प्रमाणात आढळतो. कोंकणात काजु पासून खुप काही बनवले जाते. कोंकणातील काजूची दारू खुप प्रसिद्ध आहे आणि तीला विदेशातही मोठया प्रमाणावर मागणी आहे. हि दारू काजुच्या बोंडापासून तयार केलि जाते. कोंकणातील काजुची भाजीही केली जाते आणि कोंकणी माणसाची आवड आहे. 





रतांबे


        कोंकणात रतांबे हि एक वैशिष्ट्याची बाब आहे. रतांबे बोलले कि तोंडाला पानी सुटते. दात कितीही चिकट होत असले तरी आपण ते खाण सोडत नाही. या पासून कोकम तयार केले जाते. कोकणी लोक यावरच पुरेसा पैसा कमवतात. रतांबेपासून कोकम सरबत हि बनवले जाते. कोकम सरबत बनवण्यासाठी कोंकणात काही शाखा आहेत. कणकवलीत गोपुरी भागात कोकम सरबत बनवण्यासाठी विविद्ध प्रयोग केले जातात. हे हि विदेशात मोठया प्रमाणावर विकले जाते.


करवंद


        करवंद बोलले कि तोंडाला पानी तर सुटतेच आणि ती सडयावरची सफर आठवते. हि सफर कोकणात गेलेल्यान्नाच माहित असणार. फिरता फिरता वाटेत लागलेली करवंदाची झाडे आणि हावऱ्यासारखे करवंद तोडने सर्व काही डोळ्यासमोर येते. करवंदाचे लोणचे तर सर्वांना ठाउकच आहे.



Friday 7 June 2013

"""महाराष्ट्रातील लेण्या"""

           "महाराष्ट्र राज्य खासकरुन लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. भारतामध्ये सर्वात अधिक लेण्या महाराष्ट्र राज्यात आहेत. हे लेण्या खुप पुरातन काळातल्या आहेत. त्यातल्या खुपशा लेण्या विहारास आणि चैत्यास होत्या. यातील खुपशा लेण्या बुद्धिस्ट ,हिंदू  आणि  जैन अनुयायांनी कोरलेल्या आहेत. प्रत्येक लेण्यांमध्ये काही ना काही वैशिष्ट्ये आहेत. बहुतेक लेण्या डोंगराच्या मध्यभागी कोरलेल्या आहेत आणि काही अंधारात कोरलेल्या आहेत. प्रत्येक लेण्यातील कोरीव काम अतिशय सुरेख व सुंदर आहे. काही मुर्त्यांची रचना आचर्यचकित  करणारी आहेत ,उदाहरण  म्हणजे जर तुम्ही हाताच्या विटेने मूर्ति डावीकडून उजवीकडे मोजली तर एक माप मिळेल आणि उजवीकडून डाविकडे मोजली तर दुसर माप मिळेल. अशाकाही निरनिराळ्या गोष्टी पहायला मिळतात."




                                   महाराष्ट्रातील काही लेण्या


.................................................."अजिंठा लेणी" ..............................................................



अजिंठा लेणी महाराष्ट्रातील औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये जळगाव मधील अजिंठा गावामध्ये आहे. या लेणीत निरनिराळ्या प्रकारची चित्रे काढलेली आहेत. या लेणीच बांधकाम दोन काळात झालेल आहे, पहिल काम इ.स.पु. दुसऱ्या शतकामध्ये करण्यात आले होते आणि उरलेल काम इ.स.४००-६५० मध्ये करण्यात आले होते. यात २६ पेक्षा अधिक लेण्या कोरलेल्या आहेत. 







............................................................."कार्ला लेणी"..........................................................


कार्ला लेणी महाराष्ट्रातील लोणावळा मधील कर्ली गावामध्ये आहे. हि लेणी अंदाजे इ.स.१६० मध्ये बांधण्यात आलेली आहे. हि लेणी डोंगराच्या मध्यभागी कोरलेली आहे. या लेणीत हत्ती, माकड यांच्या मुर्त्या कोरलेल्या आहेत. या लेण्यातील अनोखी  म्हणजे त्यातील घुमटावर असलेल्या लाकडाचा तुकडा.हा तुकडा घुमटावर असलेल्या सरळ बांबूच्या टोकावर ठेवलेला आहे आणि कित्येक वर्ष तो तोल सावरून तसाच आहे. अशाच काही मजेदार गोष्टी या लेण्यांमध्ये पहायला मिळतात.






.........................................................."एलीफंटा लेणी" .................................................



एलीफंटा लेणी महाराष्ट्रातील मुंबई मधील घारापुरी या बेटा मध्ये आहे. हि लेणी घरापुरीची लेणी अशीही ओळखली जाते. या लेणीत एकुण ७ लेण्या आहेत, त्यापैकी ५ हिन्दू  लेण्या आणि २ बौद्ध लेण्या आहेत. हिन्दू लेण्यामध्ये शिवची मूर्ति कोरलेली आहे. हि लेणी अंदाजे इ.स. ५ आणि ६  शतकात बांधण्यात आलेली आहे. या लेण्यातील मुर्त्या बेसाल्ट खडकापासून  तयार केलेल्या आहेत. अस म्हटल जात की तिकडे कोंकण मौर्याचा वास असायचा. मौर्यंनी तो प्रदेश जिंकला होता आणि त्या नंतर त्या जागेला पुरिका असे म्हटले जाऊ लागले. हि लेणी एका बेटावर असल्यामुळे यावर खुप जनांनी राज्य करण्याचा प्रयत्न केला.

......................................................"कान्हेरी गुफा".....................................................

                                                                     
कान्हेरी गुफा महाराष्ट्रातील मुंबई मधील बोरीवली मध्ये आहे. हि लेणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानयाच्या घनदाट जंगलामध्ये आहे. हि लेणी पाहण्यासाठी पर्यटकांना सकाळी ७.३० नंतर परवानगी आहे, कारण रात्री जंगली प्राणी येण्याची शक्यता असते. कान्हेरी गुफेत बौद्ध समाजाच्या मुर्त्या कोरलेल्या आहेत. त्यामध्ये भारतातील कला आणि संस्कृती मांडलेल्या दिसतात. हि लेणी बेसाल्ट खडकापासून म्हणजे काळ्या दगडापासून बनवलेली आहे. या लेणीच काम इ.स.पु. पहिल्या शतकामध्ये करण्यात आले होते. गुफेत जाण्यासाठी दगडामध्ये पायऱ्या कोरलेल्या आहेत. या लेणीत काही लेख लिहलेले आहेत. लेणी ३४ मध्ये अर्धवट राहिलेले चित्रकाम आहे. 

             अर्धवट राहिलेले चित्रकाम    



                दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या  



           प्रार्थना करण्याची जागा