''गणेश चतुर्थी'' गणपतीचा जन्म झालेला दिवस. "गणेशोत्सव" लोकमान्य टिळकांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी प्रस्थापित केलेला उत्सव. स्वातंत्र्यपुर्व काळात इंग्रजांनी लोकांना एकत्र भेटण्यास मनाई होती जेणेकरून ते एकत्र येउन त्यांच्याविरुद्ध काही कट रचु शकणार नाही, पण यावर उपाय म्हणून टिळकांनी गणेशोत्सव करण्याचे ठरविले आणि त्या निमित्ताने सर्व एकत्र येतील आणि इंग्रज सरकार काही करूही शकणार नव्हते. लोकमान्य टिळकांनी १८९३ साली ह्या उत्सवाला सुरवात केली. गणपतीची मूर्ती आणुन तीला मकरामध्ये प्रस्तापित करुन तीची पुजा केली गेली आणि अनंत चतुर्थीच्या दिवशी तीचे विसर्जन करण्यात आले. यानंतर पूर्ण राज्यामध्ये हा सण साजरी करण्यात येऊ लागला. गणेशोत्सव येण्याच्या एक महिना अगोदर गणेशोत्सवाच्या तयारीची सुरवात होते. प्रत्येकजण आपापल्यापरीने गणेशाच्या मकराची सजावट करतात. गणेश मूर्ती बनवणारे कारागीरही अतिशय सुरेख अश्या मुर्त्या बनवतात. वेगवेगळ्या मागणीनुसार हे कारागीर मुर्त्या बनवतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्व लोक मुर्त्या आणतात आणि वाजत गाजत गणरायाचं स्वागत करतातत. गणेशाची दर दिवशी पुजा केली जाते. गणेश चतुर्थी नंतर गणपतीला निरोप देण्याची वेळ येते. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने गणेश मूर्तीचे विसर्जन करतात. काही गणपती दिड दिवसाचे तर काही पाच आणि सात दिवसाचे असतात आणि काही जण अनंत चतुर्थीच्या दिवशी विसर्जन करतात तर काही मोठे गणेश मूर्ती ११ दिवसांनी विसर्जित केले जातात. विसर्जनाच्यावेळी सर्व जण गणपतीला पुढच्या वर्षी लवकर येण्याची मागणी करतात आणि वाजत गाजत गणपतीला निरोप देतात.
आताच्या काळात खुप गणेश मंडळ तयार झाले आहेत. मुंबई मध्ये गणेश गल्ली, लालबागचा राजा, तेजुकाया मंडळ, अशे बहुतेक मंडळ गणपती सण साजरा करतात आणि मंडळात येणारा निधी पुढच्या वर्षाच्या सणासाठी आणि काही आश्रमाध्ये दान केले जातात. ह्या गणपतींना भेट देण्यासाठी मोठ मोठे दिग्गज व्यक्ती येथे येतात. मोठ्या श्रद्ध्येने आणि भावनेने लोकं ह्या गणपतीच्या दर्शानासाठी दिवसभर रांगेत उभे राहतात आणि गणेशाचे दर्शन घेतात. ह्या गणपतींच्या विसर्जनाच्या वेळीही खुप लोकं येतात आणि आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात.