Pages

mashaal

Thursday 11 July 2013

"" मायबोली मराठी ""




"मराठी हि इंडो आर्यन भाषा आहे. मराठीचा उगम संस्कृत भाषेतून झालेला आहे. मराठी भाषा हि महाराष्ट्राची मातृभाषा आहे आणि हि भारतातील २३ मातृभाषांपैकी एक भाषा आहे. जगातील अधिकतम बोलण्यात येणाऱ्या भाषांपैकी मराठी भाषा हि १९ वी भाषा आहे. मराठी भाषा भारतात जास्त बोलली जाणारी ४ थी भाषा आहे. काहीशी मराठी भाषा गुजरात, मध्यप्रदेश, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि दिव दमण बेट या भागतही बोलली जाते. मराठी भाषेचे अजुन उपभाषाही आहेत ,जसे कि खांदेशी ,अहिरनी ,वर्हाडी ,सामवेदी आणि वादवली. अहिरनी हि भाषा धुळे ,नाशिक ,जळगाव आणि नंदुरबार या ठिकाणी बोलली जाते.खांदेशी हि भाषा खांदेश या ठिकाणी बोलली जाते.वर्हाडी हि भाषा  विदर्भ या भागात बोलली जाते.कोंकणी भाषा हि एक वेगळी स्वतंत्र भाषा आहे, कोंकणी भाषेतही उपभाषा आहेत जसे की मालवणी ,वरली ,डांगी आणि आगरी "